MPSC Mitra | MPSC Mentor

खाद्यग्रंथांतील संस्कृती

खाद्यग्रंथांतील संस्कृती

[vc_row][vc_column][vc_column_text]पदार्थाचा आणि त्याबरोबरच समाजाचाही इतिहास पाककलेच्या पुस्तकांमधून प्रतिबिंबित होतो. केवळ पाककृतीच नव्हेत, तर त्यांची नावं, त्यातले जिन्नस, भांडी, उपकरणे, वापरलेली भाषा हे सर्व काही या पुस्तकांतून आपण पाहू शकतो. समाजाचा आहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सुगृहिणींची व्याख्या, त्यांचं स्वयंपाकघरातील कर्तव्य आणि कर्तृत्व, तसंच देशांचं अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचे अंतप्र्रवाह पुस्तकांमधून व्यक्त होतात. या दृष्टीने पाककलाविषयक पुस्तकं संस्कृतीची निदर्शक ठरू शकतात. म्हणूनच खाद्यसंस्कृतीचा आढावा घेणारे हे सदर दर पंधरवड्याने. डॉ. मोहसिना मुकादम या रुईया महाविद्यालयात इतिहास विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘ब्रिटिश काळात बदललेली भारतीय खाद्य संस्कृती’ या विषयात पीएच.डी. केली असून ‘फूड हिस्ट्री’ हा त्यांचा अभ्यास आणि संशोधनाचा विषय आहे. त्यांनी...

Continue Reading →

हार्मोनियमचा डॉक्टर

Harmonium Guide (हार्मोनिअम गाईड)

[vc_row][vc_column][vc_column_text]प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले तरी गाण्यातली "दुर्गुणवत्ता' काही लपत नसते! हार्मोनिअम या वाद्याशी माझी गट्टी लहानपणीच जमली. कारण, माझी आई शांताबाई (तिच्या वडिलांप्रमाणेच) उत्तम हार्मोनिअमवादक असून नारायणराव व्यास यांच्याकडे गाणं शिकलेली होती. साहजिकच, मी पेटी वाजवायला कधी शिकलो हे आठवतही नाही. संगीताचा काहीच पत्ता नसतानाही कोणतंही ऐकलेलं गाणं माझ्या बोटांतून निघत असे. अवघा तीन वर्षं चार महिने वयाचा असताना शाळेच्या रिपोर्टमध्ये "हा मुलगा...

Continue Reading →

स्पर्धा परीक्षेसाठी शब्दसंपदेचा अभ्यास

स्पर्धा परीक्षेसाठी शब्दसंपदेचा अभ्यास

या मालिकेच्या पहिल्याच लेखात आपण पाहिले की उत्तम प्रशासनाचा मूलाधार आहे अचूक माहिती, वेगवान कार्यवाही आणि संवादकौशल्य. या सर्वांसाठी आवश्यक आहे ते भाषाज्ञान. स्पर्धा परीक्षेद्वारे हे भाषाज्ञान ओळखण्याची कसोटी म्हणजे व्याकरणाबरोबर वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द अशा शब्दसंपदेवर आधारित प्रश्न. व्याकरणासारख्या काहीशा नियमबद्ध अभ्यासानंतर आज आपण या शब्दसंपदेवर आधारित अभ्यासक्रमाबाबत माहिती घेणार आहोत. एखादी व्यक्ती भाषाज्ञानी आहे, तिचे भाषेवर प्रभुत्व आहे असे आपण केव्हा म्हणतो, तर जेव्हा ती व्यक्ती तिचे बोलणे, लिहिणे किंवा व्यक्त होणे हे उत्तम अर्थवाही संवादाद्वारे पर्यायाने वाक्यरचना आणि शब्दांद्वारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकते. मात्र, दैनंदिन भाषेत कोणतीही विशेष शब्दसंपदा न वापरता केवळ परीक्षेला विचारतात म्हणून वाक्प्रचार-म्हणी,...

Continue Reading →

स्पर्धा परीक्षा – गद्य आकलन

स्पर्धा परीक्षा – गद्य आकलन

भाषा हे सामाजिक व्यवहाराचे साधन आहे. भाषात्मक संवादातून आणि आकलनातून आपण ज्ञानाची देवाणघेवाण करतो. त्यामुळे सर्वांसाठीच उत्तम आकलन ही एक महत्त्वाची क्षमता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेची चाचपणी करण्यासाठी या परीक्षेत उताऱ्यावरील प्रश्नांचा समावेश असतो. केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर शालेय पातळीवरही गद्य आकलन किंवा उताऱ्यावरील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा प्रश्नप्रकार विद्यार्थ्यांना नवीन नाही. मात्र, म्हणून तो सोपा आहे असेही नाही. आशय समजून वेगवान वाचन, भाषाज्ञान आणि योग्य उत्तरे शोधण्याचे तंत्र यामुळे प्रश्नांची अचूक उत्तरे शोधणे सोपे जाते. आता आपण याविषयी काही महत्त्वाची माहिती पाहूया. • प्रथम उतारा काळजीपूर्वक वाचावा. उताऱ्यातील आशय समजणे सर्वांत महत्त्वाचे • वाचतानाच महत्त्वाचे...

Continue Reading →

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – वाक्यविचार

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – वाक्यविचार भाग ५

वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह हे आपल्याला माहीत आहेच. आपल्या आजच्या वाक्यविचार या घटकासंदर्भात ज्येष्ठ कोशकार वि. वा. भिडे यांचा एक विचार इथे सारांशाने उदधृत करावासा वाटतो.

Continue Reading →

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – शब्दविचार 2

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – भाग ४

मागील लेखात आपण व्याकरणातला शब्दविचार शिकताना ‘शब्दांच्या पलीकडले’ ही ओळ आठवावी असे म्हटले होते. कारण प्रत्येक स्वतंत्र ‘शब्दाच्या पलीकडे’ जाऊन त्या शब्दाद्वारे वाक्यात कोणते कार्य घडले आहे, त्या संदर्भावर त्या शब्दाची जात (प्रकार) अवलंबून असते.

Continue Reading →

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – शब्दविचार १

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – शब्दविचार – १

शब्दांवाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले ……… मंगेश पाडगावकरांच्या लेखणीतून उतरलेले, पु ल देशपांडे यांनी संगीत दिलेले आणि जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरसाज दिलेले हे अजरामर गीत तुम्हाला माहीत असेलच.

Continue Reading →

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण – वर्णविचार

स्पर्धापरीक्षा मराठी व्याकरण – वर्णविचार

भाषेची घडण समजून घेताना लक्षात येते की, भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णांनी बनतात. त्यामुळे व्याकरणाचे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार असे 3 घटक पडतात.

Continue Reading →

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास

स्पर्धापरीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास

उत्तम प्रशासनाचा मूलाधार आहे – अचूक माहिती, वेगवान कार्यवाही आणि संवादकौशल्य. या सर्वांसाठी आवश्यक आहे उत्तम भाषाज्ञान. म्हणूनच प्रशासकीय अधिकार्‍यांच्या निवडीसाठी घेतल्या जाणार्‍या परीक्षांमध्ये भाषाज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे.

Continue Reading →