पदार्थाचा आणि त्याबरोबरच समाजाचाही इतिहास पाककलेच्या पुस्तकांमधून प्रतिबिंबित होतो. केवळ पाककृतीच नव्हेत, तर त्यांची नावं, त्यातले जिन्नस, भांडी, उपकरणे, वापरलेली भाषा हे सर्व काही या पुस्तकांतून आपण पाहू शकतो…
पदार्थाचा आणि त्याबरोबरच समाजाचाही इतिहास पाककलेच्या पुस्तकांमधून प्रतिबिंबित होतो. केवळ पाककृतीच नव्हेत, तर त्यांची नावं, त्यातले जिन्नस, भांडी, उपकरणे, वापरलेली भाषा हे सर्व काही या पुस्तकांतून आपण पाहू शकतो…
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे…
(more…)
माझे वडील पोलीससेवेत कार्यरत असल्याने शासकीय काम व शासकीय अधिकार याबाबत घरी सतत चर्चा होत असे. मी प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारी व्हावे, ही माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यांच्याकडूनच मला खरी प्रेरणा मिळाली. त्यामुळे अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते, याची सविस्तर माहिती मी सतत मिळवत राहिलो. हे ध्येय मी पक्के ठरवले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील रेठरे वारणा हे माझं मूळ गाव. पण वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने बालपण मुंबईला गेल्याने सर्व शिक्षण मुंबईतच झालं. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी व अभ्यासासाठी पुण्यात चांगलं पोषक वातावरण आहे असं कळल्यामुळे मी पुण्यात आलो आणि परीक्षेची तयारी करण्यास सुरवात केली. पण आर्थिक अडचणीमुळे मी पुण्यात कायम स्वरुपी राहू...
स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना आपण एक जबाबदार नागरिक असून कर्तव्य दक्ष अधिकारी बनण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहोत. आपली ही तयारी केवळ पाठांतर करून, घोकंपट्टीच्या आधारे नसावी, त्या त्या विषयाच्या संकल्पना नेमक्या समजून घेवून त्या प्रत्यक्ष कशा वापराव्यात याबद्दल आपला सर्वंकष अभ्यास व्हायला हवा.
सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकातील ‘शब्दसिद्धी’ या महत्त्वाच्या प्रकरणातून जास्तीत जास्त तत्सम, तद्भव, देशी व परभाषीय शब्द (मुख्यतः फारसी व अरबी) विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.