या पुस्तकामध्ये इंग्रजी व्याकरणाच्या मूळ संकल्पना सोप्या मराठीतून सांगितल्या आहेत. प्रत्येक संकल्पनेचे उदाहरणांसहित स्पष्टीकरण दिले आहे. स्वयंअध्ययनासाठी भरपूर प्रश्न व ते सोडविण्यासाठी तिथेच जागा दिली आहे. मागील परीक्षांमध्ये येऊन गेलेल्या प्रश्नांचा तसेच नवीन सराव प्रश्नांचा भरपूर संग्रह यामध्ये दिला आहे. व्याकरण विभागाच्या शेवटी असलेल्या उपयुक्त अशा ‘ग्रामर ग्राफ्स’ या नवीन संकल्पनेद्वारे व्याकरण अधिक चांगल्याप्रकारे समजण्यास मदत होईल हे निश्चित. याशिवाय स्पर्धापरीक्षेसाठी अभ्यास कसा करावा, प्रश्न कसे विचारले जातात, ते झटपट सोडविण्याच्या क्लृप्त्या तसेच परीक्षेविषयी इतर उपयुक्त माहितीच्या विशेष विभागांचाही यामध्ये समावेश केला आहे.
Reviews
There are no reviews yet.