नोटेशनसह भक्तिगीते भाग 1 व 2 – इतर अनेक गीते गायली जात असली तरी सध्याच्या धकाधकीच्या काळात मनाला शांती व समाधान देण्याची ताकद केवळ भक्तिगीतातच आहे. आजच्या रिमिक्सच्या जमान्यातही गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या, भक्तिरसाने ओथंबलेल्या निवडक भक्तिगीतांचा हा संच आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व, नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. तसेच गाण्याचे मूळ गायक, संगीतकार, गीतकार यांचाही परिचय दिला आहे.
भक्तिगीते वाजवण्यासाठी खास टिपा व उपयुक्त सूचना या पुस्तकाच्या दोन्ही भागात दिल्या आहेत. अगदी सकाळी कानावर पडणाऱ्या भूपाळीपासून विरहिणीपर्यंत एकूण 30 गाण्यांचा परिचय या पुस्तकात दिला आहे. हार्मोनियमवर किंवा कॅसिओवर वाजवता येतील अशी किंवा गातानाही एखादी जागा अडत असेल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक !
320 रुपयांचा 2 पुस्तकांचा हा संच आता मिळावा फक्त 250 रुपयांत !*
Reviews
There are no reviews yet.