हार्मोनियमविषयी सर्व काही या पुस्तकामध्ये दिले आहे. पेटीवरील पट्ट्यांची माहिती, बोटे कशी ठेवावीत, सरावासाठी अलंकार, रागांचे महत्त्व, रागपद्धतीचे नियम, रागांचे समय, 10 थाट, महत्त्वाच्या रागांचे आरोह अवरोह, त्यावर आधारित लोकप्रिय गीते, ताल परिचय, महत्त्वाच्या तालांचे विस्तृत स्पष्टीकरण या साऱ्याचा या पुस्तकामध्ये समावेश केला आहे. हार्मोनियम शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायला हवेच!