खास चांद्रसेनीय कायस्थ प्रभू शैलीच्या शाकाहारी तसेच मांसाहारी चविष्ट रेसिपीजचा यामध्ये समावेश केला आहे. सी.के.पी स्पेशल भरली सांदणी, आरत्या, निनावे, कानवले; भुजणे; डाळिंब्याचे बिरडे; खास सी.के.पी मसाला; अनेक प्रकारच्या रानभाज्या; भातांचे विविध प्रकार; अगदी रोजच्या खाण्यातल्या चटण्यांपासून खास बिर्याणीपर्यंत विविध पाककृतींचा यामध्ये समावेश केला आहे. प्रत्येक पाककृतीच्या सामग्रीचे प्रमाण अगदी काटेकोर दिल्यामुळे प्रत्येक पाककृती ‘हमखास’ जमणारच ! या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, या पाककृतींमध्ये बटर, पनीर, सॉस यासारखा कुठलाही बाहेरील पदार्थ वापरलेला नाही. सगळे घरगुती मसाले वापरले आहेत. अत्यंत निगुतीने करावयाच्या या पाककृती करताना सुगरणींना व चवीने खाणाऱ्या सगळ्यांना नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल यात शंका नाही. या पाककृती करताना वापरावयाच्या पदार्थांविषयी, कृतीविषयी विशेष माहिती व टिप्समुळे सर्व गृहिणींसाठी अत्यंत उपयुक्त असे हे छोटे पण सुंदर पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.