Tag: मराठी व्याकरण

स्पर्धा परीक्षेसाठी शब्दसंपदेचा अभ्यास

स्पर्धा परीक्षेसाठी शब्दसंपदेचा अभ्यास

या मालिकेच्या पहिल्याच लेखात आपण पाहिले की उत्तम प्रशासनाचा मूलाधार आहे अचूक माहिती, वेगवान कार्यवाही आणि संवादकौशल्य. या सर्वांसाठी आवश्यक आहे ते भाषाज्ञान. स्पर्धा परीक्षेद्वारे हे भाषाज्ञान ओळखण्याची कसोटी म्हणजे व्याकरणाबरोबर वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द अशा शब्दसंपदेवर आधारित प्रश्न. व्याकरणासारख्या काहीशा नियमबद्ध अभ्यासानंतर आज आपण या शब्दसंपदेवर आधारित अभ्यासक्रमाबाबत माहिती घेणार आहोत. एखादी व्यक्ती भाषाज्ञानी आहे, तिचे भाषेवर प्रभुत्व आहे असे आपण केव्हा म्हणतो, तर जेव्हा ती व्यक्ती तिचे बोलणे, लिहिणे किंवा व्यक्त होणे हे उत्तम अर्थवाही संवादाद्वारे पर्यायाने वाक्यरचना आणि शब्दांद्वारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकते. मात्र, दैनंदिन भाषेत कोणतीही विशेष शब्दसंपदा न वापरता केवळ परीक्षेला विचारतात म्हणून वाक्प्रचार-म्हणी,...

Continue Reading →