Tag: mpsc marathi grammar

स्पर्धा परीक्षेसाठी शब्दसंपदेचा अभ्यास

स्पर्धा परीक्षेसाठी शब्दसंपदेचा अभ्यास

या मालिकेच्या पहिल्याच लेखात आपण पाहिले की उत्तम प्रशासनाचा मूलाधार आहे अचूक माहिती, वेगवान कार्यवाही आणि संवादकौशल्य. या सर्वांसाठी आवश्यक आहे ते भाषाज्ञान. स्पर्धा परीक्षेद्वारे हे भाषाज्ञान ओळखण्याची कसोटी म्हणजे व्याकरणाबरोबर वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द अशा शब्दसंपदेवर आधारित प्रश्न. व्याकरणासारख्या काहीशा नियमबद्ध अभ्यासानंतर आज आपण या शब्दसंपदेवर आधारित अभ्यासक्रमाबाबत माहिती घेणार आहोत. एखादी व्यक्ती भाषाज्ञानी आहे, तिचे भाषेवर प्रभुत्व आहे असे आपण केव्हा म्हणतो, तर जेव्हा ती व्यक्ती तिचे बोलणे, लिहिणे किंवा व्यक्त होणे हे उत्तम अर्थवाही संवादाद्वारे पर्यायाने वाक्यरचना आणि शब्दांद्वारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकते. मात्र, दैनंदिन भाषेत कोणतीही विशेष शब्दसंपदा न वापरता केवळ परीक्षेला विचारतात म्हणून वाक्प्रचार-म्हणी,...

Continue Reading →

स्पर्धा परीक्षा – गद्य आकलन

स्पर्धा परीक्षा – गद्य आकलन

भाषा हे सामाजिक व्यवहाराचे साधन आहे. भाषात्मक संवादातून आणि आकलनातून आपण ज्ञानाची देवाणघेवाण करतो. त्यामुळे सर्वांसाठीच उत्तम आकलन ही एक महत्त्वाची क्षमता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेची चाचपणी करण्यासाठी या परीक्षेत उताऱ्यावरील प्रश्नांचा समावेश असतो. केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर शालेय पातळीवरही गद्य आकलन किंवा उताऱ्यावरील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा प्रश्नप्रकार विद्यार्थ्यांना नवीन नाही. मात्र, म्हणून तो सोपा आहे असेही नाही. आशय समजून वेगवान वाचन, भाषाज्ञान आणि योग्य उत्तरे शोधण्याचे तंत्र यामुळे प्रश्नांची अचूक उत्तरे शोधणे सोपे जाते. आता आपण याविषयी काही महत्त्वाची माहिती पाहूया. • प्रथम उतारा काळजीपूर्वक वाचावा. उताऱ्यातील आशय समजणे सर्वांत महत्त्वाचे • वाचतानाच महत्त्वाचे...

Continue Reading →